Vision :
- शहरातील अणि ग्रमिणभागातील विद्यार्थी यांना या नाटयशास्त्र विषयाची ओंळख व्हावी अणि नाटक, चित्रपट, संगीत आणि ललित व प्रयोगजीवी कला अर्थातअभिनय, नाटयनिर्मीती, नाटयसादरीकरण, संहीतालेखन, नेपथ्य,रंगभूषा, प्रकाशआयोजन, शिल्पकला, चित्रकला, चित्रपट, पटकथा, लोकनृत्य, नृत्य, लोकवाद्य, संगीत, शास्त्रीय संगीत लोककला, इत्यादी विषयाच्या अभ्यासाला चालना करून देणेव्स्वत:च्या पायावर उभे रहता यावे हा नाटयशास्त्र विभागाचा सरळ हेतू आहे.
- व्यावसायीकतेच्या दृष्टीनेप्रयत्न करने. पारंपरिक मराठी रंगभूमी, आधुनिक, मराठीरंगभूमी, जागतीकरंगभूमी,लोकरंगभूमी ,लोककला, लोकनृत्य, लोकगीत, लोकवाड्.मय, अभिनय, सांस्कृतिक वेगळेपण, कलेची भाषा इ. गोष्टीकडे आजचा विद्यार्थी आकर्षित व्हावा.
- नाटक फक्त मानोंरंजणाचे साधन नसूनकलेवरही पोटभरता येत अणि उपजीविकेचे साधनही कला होऊ शकते.नाटकाचा विचार शास्त्रशुद्ध पद्धतीने करता यावा तसेच प्रसार,प्रचार व प्रभोधन करणे हा प्रामाणिक हेतू आहे.
- रोजगाराभिमुख अभ्यासक्रमातुन नाटयशास्त्र विषयातील skilled(स्किल्ड) निर्माण व्हावे यासाठी अध्यापनाची अद्ययावत साधने, अध्यापनात संवादी सकारत्मक दृष्टीकोन, नाविन्य आणि विद्यार्थी व पालकांबरोबर चर्चा घडवून आणणे
Mission :
- नाटयशास्त्र विभागात नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, प्रयोगजीवी कलांना प्राधान्य, महाविद्यालयातील विद्यार्थी कलावंत लोककला, लोककलावंत यांना प्रोहत्साहन विशेष करून संशोधन करणे.
- उपेक्षित कलावंत व लोककलावंतांना कलेच्या तसेच रंगभूमीच्या मुख्यप्रवाहात आणणे.
- मराठवाड्याची रंगभूमीची ओलख करुण देणे. महाविद्यालयातील, मराठवाड्यातील नाट्यकलावंतांना नाटक, चित्रपटक्षेत्रात काम व प्राधान्य देणे.
- अनुभवी कलावंत, अभ्यासकांच्या विशेष व्याख्यानांचे आयोजन करणे.
- राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, कार्यशाळा व नाट्यमहोत्सवांचे आयोजन करणे.
- नाट्य व प्रयोगजीवी विषयांवरील बृहद संशोधन प्रकल्प हाती घेणे.
- अभिजात कलेचा विशेष अभ्यास व संशोधन करणे
- script bank (संहीता) तयार करणे
- नाटयशास्त्र या विषयातील शास्त्रीय अभ्यासाबरोबर पारंपरिक,प्रादेशिक अणि आधुनिक रंगभूमी लोक रंगभूमी विषयावर संशोधानात्मक प्रकल्प हाती घेणे.विद्यार्थ्यांनाव प्रेरणा देणे
- शेक्ष्णिक सहल, विध्यार्थी मेळावा, पालक मेळावा इत्यादींचे आयोजन करणे.
Aims of the department :
- विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासावर भर देणे.
- विद्यार्थ्यांना नाट्य, चित्रपट आणि संगीत विषयाच्या संबंधाने मूलभूत प्रशिक्षण देण्यात येईल.
- विद्यार्थ्यांमधीलअभिनय,दिग्दर्शक, नेपथ्य, वेशभूषा,रंगभूषा,संगीत,प्रकाशयोजना,संगीतआयोजन,रंगमंचव्यवस्थापन, इत्यादीविषयी सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी नाटयशास्त्र विभागानेहमी तत्पर असेल.
- परिसरातील विविध कलांचे जतन व संवर्धन करण्यात येईल.
- जागतिक रंगभूमी व भारतीय रंगभूमीचा सर्वांगीण अभ्यास केला जाईल.