नाटयशास्त्र विभागात सर्वाचे मनापासून स्वागत…. नमस्कार
नाटक हे अनेक कलांच रूप आहे.एक शास्त्र आहे.एक व्याकरण आहे.कला वा नाटक केवळ करमणूकीसाठी नसून तो एक गंभीरपणे अभ्यासण्याचा आणि आस्वादण्याचा कलाअविष्कार आहे.कारण कुठलाही प्रयोगात भावनांची आणि विचारांची अभिव्यक्ती असतें. हे आजच्या तरूण वर्गापर्यंन्त पोहचायला हवं.असं प्रामाणिकपणे वाटतं. विद्यार्थी घडण्याच्या ,घडविण्याच्या सृजनशील प्रक्रियेत जाणिवपूर्वक माहिती ह्वावी,पडणार्या असंख्य प्रश्नांची उकल ह्वावी ,स्वत:चा शोध घेता यावा.विद्यार्थीकलावंत, रंगकर्मीच्यारंगजाणिवा,रंगसंवेदना वाढाव्यात. आपल्यात असलेल्या ,खोल दाबलेल्या घुसमंटून टाकलेल्या भावभावणांचा निचरा होण्यासाठी,आत असलेल्या न्युनगंडाला बाहेर टाकण्यासाठी ,स्वत:ला सिद्ध करत क्षमतांचा विकास करता यावा एकूणच कलेनही पोट भरता येतं याचं भाण निर्माण व्हायला हवं.कलेचा व्यवसाय कसा करावा?तुम्हाला कोण ह्वायच?कोणत्या दिशेने मार्गक्रमण करायचं आहे?किती दिवसांमधे?हे खरं तर विद्यार्थी दशेत कळायला हवं.स्व रंगभाषेची ओळख करता यायला हवी.नाट्यशिक्षणाचे धडे गिरवित असतांना घेतलेल्या शिक्षणाचे प्रत्यक्ष उपयोजन करता यायला हवं.एक व्यक्ती आणि कलाकार म्हणून स्वत:ला समजावून घेणं..असं घडल्यास निर्भिड,नाटककार,नट,दिग्दर्शक,तंत्रज्ञ घडतील आणि माणूस म्हणून समाजाला संस्कृतिला पुढे नेण्यास नेहमीच प्रेरक ठरेल.
हि प्राजंळ भूमिका घेऊनदेवगिरी महाविद्यालयच्यानाटयशास्त्र विभागाची स्थापनाशहरातील अणि ग्रमिणभागातील विद्यार्थी यांना नाटयशास्त्र विषयाची ओंळख, आवड निर्मीण व्हावी तसेचनाटक,अभिनय, नाटयनिर्मीती, नाटयसादरीकरण, संहीतालेखन, नेपथ्य,रंगभूषा,संगीत,प्रकाशआयोजन,शिल्पकला, चित्रकला, चित्रपट, पटकथा, लोकनृत्य, नृत्य, लोकवाद्य, संगीत, शास्त्रीय संगीत लोककला, इत्यादी विषयाच्या अभ्यासाला चालना देण्याच्या हेतूने सन २००३ मध्येपहीले नाटयशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.चंद्रशेखर कणसे यांनी व तत्कालीण प्राचार्य डॉ.रा.टी.देशमुख सर यांच्या प्रेरणेतून करण्यात आली. आधुनिकिकरणच्या तथा जागतिकिकरणाच्या काळातील आव्हाने पेलण्यासाठी नव्या संधी उपलब्ध करून देणे व् स्वत:च्या पायावर उभे रहता यावे हा नाटयशास्त्र विभागाचा सरळ हेतू आहे.
नाटयशास्त्र विभागात वरील कलांचे शिक्षण दिले जाते. सदर कला हया व्यावसायीकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असल्यामुळे या क्षेत्रात अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांची, अभ्यासकांची वेगळी ओळख निर्माण होते. सध्याचा काळ हा ज्ञान – विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा काळ म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीत पारंपरिक मराठीरंगभूमी, आधुनिकमराठीरंगभूमी, जागतीकरंगभूमी,लोकरंगभूमी ,लोककला, लोकगीत, अभिनय, सांस्कृतिक वेगळेपण, कलेची भाषा इ. गोष्टीकडे आजचा विद्यार्थी आकर्षित व्हावा, नाटकफक्त मानोंरंजणाचे साधन नसूनकलेवरही पोटभरता येत अणि उपजीविकेचे साधनही कला होऊ शकते.नाटकाचा विचार शास्त्रशुद्ध पद्धतीने करता यावा तसेच प्रसार,प्रचार व प्रभोधन करणे अणि व्यक्तिमत्व विकास करणेहा प्रामाणिक हेतू आहे.
मागील अनेक वर्षापासून नाटयशास्त्र विभागाने भरघोस,भरीव कामगिरी केलीअसून सलग आठ वर्षापासून उत्कृष्ट नाटयगटाचा पुरस्कार अणि सलग तिनवर्ष महाविद्यालयास साघिक पुरस्कार पटकावला. नाटयशास्त्र विभागाने पुरुषोत्तम एकाकीका स्पर्धेत अतीमसाठी निवड आशा महाराष्ट्रातील अनेक नामवंतस्पर्धा केल्या प्रथम पुरस्कार पटकावले. नाट्कच्या माध्यमातून सामाज जाग्रुती करणे,नाटयशिबीरे,नाटयमहोत्सव,चित्रपटमहोत्सव,चित्रपट निर्मीतीअशा विविध विषयांवरच्या कार्यशालाचे,उपक्रमाचे आयोजनविभागकरत आलेलेआहे.नाटयशास्त्र विभगात विविध नामांकित लेखक, नाटयकलावंत, अभिनेते, संगीतकार, वादक, अभ्यासक आणि तज्ज्ञ प्राध्यापकांनानाटयशास्त्र विभागात(workshop) कार्यशाला, (Speech)व्याख्यानांसाठी पाचारण करण्यात येते.
“रंग संवाद”:
बदलल्या काळाचे स्वरूप लक्षात घेता नाटयशास्त्र विभागाने (२०१९-२०२०) पासून नाटयशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.नीरज बोरसे यांच्या संकल्पनेतून “ रंग संवाद” या विद्यार्थीप्रिय उपक्रम सुरु केला आहे. नाट्यशिक्षणाचे धडे गिरवित असतांना घेतलेल्या शिक्षणाचे प्रत्यक्ष उपयोजन करता यायला हवं. एक व्यक्ती आणि कलाकार म्हणून स्वत:ला समजावून घेणं..असं घडल्यास निर्भिड,नाटककार,नट,दिग्दर्शक,तंत्रज्ञ घडतील आणि माणूस म्हणून समाजाला संस्कृतिला पुढे नेण्यास नेहमीच प्रेरक ठरेल. अशी प्राजंळ भूमिका घेऊन ‘रंग संवाद‘ हा सर्व कलांना सोबत घेऊन चालणारा ऊपक्रम देवगिरी महाविद्यालयाच्या नाट्यशात्र विभागाच्या वतीने सुरू करतांना मनस्वी आनंद होत आहे. म्हणून “जो व्यक्त होईल त्याला अभिव्यक्त होण्याचे व्यासपीठ” अर्थात “रंग संवाद“ परंपरा आणि नवता यामध्ये योग्य सांगड घालत “जुन्याचं जतन आणि नव्याचा स्वीकार” करून सामाजिक, सांस्कृतिक, कलात्मक वेगळेपण जोपासण्यासाठी नाटयशास्त्रविभाग नेहमीच तत्पर राहीला आहे. सांस्कृतिक,सामाजिक, शैक्षणिक, संशोधनात्मक इ. विकास साधण्यासाठी नाटयशास्त्रविभागची विशेष भूमिका राहीलेली आहे. अलीकडे नाटयशास्त्र विभागाने तीन वर्षाचा B.VOC.(Theatre and Stage Craft) हा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरु केला असुन नाटयशास्त्र विषयातील skilled(स्किल्ड) निर्माण व्हावे यासाठी अध्यापनाची अद्ययावत साधने उपलब्ध करन देणे, अध्यापनातुन सकारत्मक संवाद, दृष्टीकोन निर्माण करणे यासाठी नाटयशास्त्र विभाग नेहमीच पुढाकार घेतो,.. यासाठी मं.शि.प्र.मं.सरचिटनिस मा. आदरणिय श्री सतीश चव्हान साहेब, स्थानिक नीयमक मंडळाचे अध्यक्ष आदरणिय श्री हर्षेअन्ना व मं.शि.प्र.मंचे सर्व सदस्य देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे सर अणि सर्व उपप्राचार्य नाटयशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.नीरज बोरसे अणि विभागातील प्राध्यापक याचे अमूल्य मार्गदर्शन विभागाला सदासर्वदा मिळते.